किसिंग सीन दिले, आता हे कॉमन आहे!


दिग्दर्शक अनंत महादेवन सध्या त्यांच्या आगामी अक्सर-2’मुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचा हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. नुकतेच या चित्रपटातील जाना वे’ हे गाणे रिलीज झाले. गाण्यात अभिनेता अभिनव शुक्ला आणि जरीन खान यांनी खूपच बोल्ड सीन दिले आहेत. अरजित सिंग याने गायिलेल्या आणि हिमेश रेशमियाने संगीत दिलेल्या या गाण्यात जरीन खूपच हॉट दिसत असून, तिच्या या अदा प्रेक्षकांना खूपच भावताना दिसत आहेत. ज्या पद्धतीने जरीनने गाण्यात हॉट सीन दिले आहेत, त्यावरून हे गाणे जरीनच्या करिअरमधील आतापर्यंतचे सर्वात हॉट गाणे असावे अशी चर्चा आता रंगू लागली आहे. याविषयी जरीनला जेव्हा विचारण्यात आले तेव्हा तिने दिलेले उत्तर खरोखरच धक्कादायक होते. तिने म्हटले की, चित्रपटात आता हे सर्व कॉमन आहे.’ सुरुवातीला असे वाटत होते की, हा एक इरॉटिक चित्रपट असावा. परंतु दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्ट केले की, हा इरॉटिक चित्रपट नाही. त्यांनी म्हटले की, हा एका थ्रिलर सस्पेंस ड्रामा असून, प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवील. अक्सर’च्या पहिल्या भागात काही उत्तेजित करणारे सीन्स आहेत. मुळात त्याची कथाच सेक्स सीन्सवर आधारित होती. परंतु अक्सर-2’ यापेक्षा हटके आणि वेगळा आहे. चित्रपटात सहा कलाकार दिसणार असून, ते सर्व एक बौद्धिक खेळ खेळताना दिसणार आहेत. हा एक क्लासिक सस्पेंस चित्रपट आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जरीन खान आणि अभिनव शुक्ला यांच्यात जबरदस्त लव्हमेकिंग सीन्स दाखविण्यात आले आहेत. जरीनने तर आतापर्यंत सर्वात जास्त हॉट सीन्स या चित्रपटात दिल्याची चर्चा आहे. जेव्हा याविषयी जरीनला विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, माझ्यात आणि अभिनवमध्ये बरेचसे किसिंग सीन्स आहेत. मात्र चित्रपटांमध्ये हे सर्व कॉमन आहे. जसे लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटात किसिंग सीन्स व्यतिरिक्त बरेचसे असे कामुक सीन्स दाखविण्यात आले आहेत.’ सलमान खानसोबत वीर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केलेल्या जरीनने याअगोदरही बरेचसे हॉट सीन दिले आहेत. मात्र या चित्रपटात तिचा अंदाज खूपच वेगळा दिसणार आहे. वीर’नंतर जरीनने वजन वाढविल्यामुळे तिला इंडस्ट्रीतील दरवाजे जणू काही बंद झाले होते. परंतु आता जरीनने स्वत:च्या फिगरकडे विशेष लक्ष दिल्याने पुन्हा एकदा तिला लीड रोल मिळत आहेत.